PM Narendra Modi : मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 वाजता देशाला संबोधित करणार

नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi) आज रात्री 8 वाजता देशवासीयांना संबोधित करणार आहेत. भारत आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीवर पंतप्रधान आज नेमकं काय बोलणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे. कारण, भारतीय हवाई दलाने 7 मे रोजीच्या मध्यरात्री पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी (Terrorist) तळांवर हल्ले केले होते. या लष्करी कारवाईनंतर सैन्य दलाच्या प्रमुखांनी आणि परराष्ट्र सचिवांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. मात्र, एअर स्ट्राईकनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कुठलेही अधिकृत स्टेटमेंट दिले नव्हते किंवा कुठेही भाष्य केले होते. आता, हल्ल्याच्या घटनेनंतर पहिल्यांदाच पंतप्रधान देशवासीयांना संबोधित करणार आहेत. 

भारतीय सैन्य दलाकडून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सीमारेषेवरील कारवायांची माहिती देण्यात आली. नुकतेच, तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांनी पत्रकार परिषद घेत भारतीय सैन्य दलाच्या कारवाईचं कौतुक केले. तसेच, भारतीय वायू दलाचे सर्वत तळ शाबूत असून आपले सर्व एअर पायलट सुरक्षित असल्याची माहितीही एअर मार्शल ए.के. भारती यांनी दिली. या पत्रकार परिषदेनंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता देशवासीयांना संबोधित करणार असून पाकिस्तानला काय इशारा देतात हे पाहावे लागेल. दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधीचा निर्णय घेण्यात आला असून काल म्हणजेच रविवार दुपारपासून सीमारेषेवर कुठलाही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती आहे. त्यामुळे, दोन्ही देशातील सैन्य कारवायांना ब्रेक मिळाला आहे. दरम्यान, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलतील, भारत-पाक युद्धाबाबत काय माहिती देतील याची उत्सुकता भारत-पाकिस्तान यांच्यातील नागरिकांसह जगभरातील देशांना लागली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola