PM Narendra Modi Full Speech : नेपाळमधील अपघातानंतर मोदींचा रक्षा खडसेंना फोन, नेमकं काय घडलं?

Continues below advertisement

PM Narendra Modi Full Speech : नेपाळमधील अपघातानंतर मोदींचा रक्षा खडसेंना फोन, नेमकं काय घडलं?

एक महिला लखपती झाली तर पूर्ण परिवाराचे भाग्य बदलते. भारत जगाची तिसरी ताकद बनत आहे. त्यात महिलांचे मोठे योगदान आहे. याआधी अशी स्थिती नव्हती. मागील सरकारचे 7 दशक आणि मोदी सरकारचे 10 वर्ष तराजूत तोला. स्वातंत्र्यानंतर मोदी सरकार इतके काम कोणी केले नाही, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केला. जळगाव येथे आयोजित लखपती दीदी (Lakhpati Didi) कार्यक्रमातून ते बोलत होते. 

महाराष्ट्रातील माझ्या बंधू भगिनींना जय श्रीकृष्ण. उद्या श्रीकृष्ण जयंती आहे मी तुम्हाला आजचं शुभेच्छा देतो, असे मराठीत म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. ते पुढे म्हणाले की, नेपाळ बस दुर्घटनेत आपण जळगावातील अनेक सहकाऱ्यांना गमावले. जेव्हा ही घटना घडली भारत सरकारने त्वरित नेपाळ सरकारचे संपर्क साधला. आपण मंत्री रक्षा खडसे यांना त्वरित नेपाळला जाण्यास सांगितले. दुर्घटनेत मृत पावलेल्या लोकांचे मृतदेह आपण विशेष विमानाने परत आणले. जे जखमी आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमी लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो. पीडित कुटुंबियांना केंद्र आणि राज्य सरकारकडून पूर्ण मदत मिळणार आहे. 

लाखो बहिणींना लखपती दीदी बनण्यासाठी मदत मिळणार 

आज लखपती दीदीचे हे महासंमेलन पार पडत आहे. माझ्या सर्व लाडक्या बहिणी येथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आज इथून देशभरातून लाखो बहिणींसाठी सहा हजार करोड रुपयांची राशी जारी करण्यात आली आहे. लाखो बचत गटांनी जोडल्या गेलेल्या महाराष्ट्रातील बहिणींना सुद्धा कोट्यावधी रुपयांची मदत मिळाली आहे. या पैशांनी लाखो बहिणींना लखपती दीदी बनण्यासाठी मदत मिळणार आहे. माझ्या सर्व माता आणि भगिनींना शुभेच्छा.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram