Aditya Thackeray : penguin ते Cheetah; सत्ताधाऱ्यांच्या प्रत्येक टोल्यावर आदित्य ठाकरेंचा पलटवार
Aditya Thackeray : penguin ते Cheetah; सत्ताधाऱ्यांच्या प्रत्येक टोल्यावर आदित्य ठाकरेंचा पलटवार
मुंबईतील (Mumbai News) वरळीत (Worli) अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांचे भावी उमेदवार म्हणून बॅनर झळकले आहेत. वरळीत 'घड्याळ'वाला आमदार विजयी व्हावा, असा उल्लेख असलेले बॅनर झळकल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे महायुतीत अजित पवार गट वरळी मतदारसंघावर दावा करणार का? याकडे लक्ष लागलं आहे. दरम्यान, सध्या ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे वरळीचे आमदार आहेत, तर मनसे वरळीतून संदीप देशपांडे यांना उतरवण्याच्या तयारीत आहे. मिटकरींच्या नावानं वरळीत झालेल्या बॅनरबाजीमुळे राजकीय वर्तुळात काहीसं कुतुहल निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे.
मुंबईतील वरळी भागात अनेक ठिकाणी अमोल मिटकरी यांचे भावी उमेदवार म्हणून बॅनर्स झळकले आहेत. मुंबई राष्ट्रवादीचे सरचिटणीस नागेश मढवी यांच्या नावानं शुभेच्छुक म्हणून हे बॅनर्स झळकले आहेत. अमोल मिटकरींच्या रुपानं एकदा वरळीत 'घड्याळ'वाला आमदार विजयी व्हावा असा उल्लेख बॅनर्सवर करण्यात आला आहे. सध्या ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे वरळीचे आमदार आहेत. तर मनसे वरळीतून संदीप देशपांडे यांना उतरवण्याच्या तयारीत आहे. मिटकरींच्या नावाने वरळीत झालेल्या बॅनरबाजीमुळे राजकीय वर्तुळात कुतूहल निर्माण झालं आहे. याआधी 2009 मध्ये सचिन अहीर यांच्या रुपानं वरळीतून राष्ट्रवादीचा आमदार निवडून आला होता. सचिन अहिर आता ठाकरेंच्या शिवसेनेत आहेत. त्यामुळे वरळीवर राष्ट्रवादीचा अजित पवार गट दावा करणार का? याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.