PM's Diwali on Vikrant: 'INS विक्रांतच्या नावानेच Pakistanची झोप उडाली', मोदींचा हल्लाबोल
Continues below advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षीची दिवाळी आयएनएस विक्रांत (INS Vikrant) या स्वदेशी विमानवाहू युद्धनौकेवर नौसैनिकांसोबत साजरी केली. यावेळी त्यांनी नौदल जवानांना संबोधित करताना पाकिस्तानवर निशाणा साधला. पंतप्रधान मोदी म्हणाले, 'काही महिन्यांपूर्वीच आपण पाहिलं की, केवळ विक्रांतच्या नावानेच पाकिस्तानची झोप उडाली होती'. मोदींनी 'ऑपरेशन सिंदूर'चा उल्लेख करत म्हटले की, तिन्ही सैन्यदलांमधील उत्तम समन्वयामुळे पाकिस्तानला गुडघे टेकायला भाग पाडले. 'आयएनएस विक्रांत' हे केवळ युद्धनौका नसून २१व्या शतकातील आत्मनिर्भर भारताच्या सामर्थ्याचे प्रतीक आहे, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी जवानांना मिठाई वाटली आणि त्यांच्यासोबत देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमातही भाग घेतला.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement