PM Modi America Tour :मोदी ट्रम्प यांची गळाभेट, अमेरिका भेटीतून काय साधलं?
PM Modi America Tour :मोदी ट्रम्प यांची गळाभेट, अमेरिका भेटीतून काय साधलं?
मोदी आपल्यापेक्षा चांगले निगोशिएटर आहेत अशा शब्दामध्ये कौतुक केल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी. व्हाईट हाऊसमध्ये मोदी आणि ट्रम्प यांची भेट झाली. यावेळी मुत्सद्यगिरी दाखवण्यामध्ये वरचड कोण ठरलं? भारताच्या दृष्टीने या भेटीचे महत्व काय आहे आणि भारत अमेरिका संबंधांवर या भेटीचा काय परिणाम होणार असे असंख्य प्रश्न आहेत. त्यासाठीच पाहूया हा स्पेशल रिपोर्ट. केवळ भारत अमेरिकाच नव्हे तर जगाच लक्ष या भेटीकडे लागलं होतं. कारण होतं आयात शुल्कावरून अमेरिकेने डोळे वटारल्यान अनेक देशांची उडालेली धावपड. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्र दुसऱ्यांदा हाती घेतल्यानंतर ट्रम्प यांनी आयात शुल्कावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. भारतासह अनेक देशांना त्यांनी जबर आयातकर लावण्याचा इशारा दिलाय. या सगळ्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांच्या भेटीसाठी मोदी व्हाईट हाऊस मध्ये दाखल झाले. गळाभेट घेऊन ट्रम्प यांनी मोदींच जोरदार स्वागत केलं. अवर जर्नी टुगेदर असं नाव असलेल्या ट्रम्प आणि मोदींच्या खास भेटीचा फोटो असलेले पुस्तक आपली फराटेदार सही ठोकत मोदी. एफ 35 फायटर जेट पुरवण्याचा करार झालाय. बांग्लादेशचा मुद्दा कसा सोडवायचा याचा निर्णय ट्रम्पनी मोदींवर सोपवला. अमेरिकेतल्या भारतीयांसाठी लॉस एंजलीस आणि बोस्टन मध्ये वाणिज्य दूतावासाची लवकरच स्थापना होणार आहे. खनिज, प्रगत साहित्य आणि औषधांच्या मजबूत पुरवठा साखळीवर विशेष भर देण्यात येतो. ट्रम्प यांच्या कार्यकाळात भारत-अमेरिका संबंध आणखी दृढ होणार की ट्रम्प यांच्या कलाने भारताला नमत घ्यावा लागणार हा चर्चेचा मुद्दा आहे. अमेरिकेने चीनवर 10% आयात शुल्काची घोषणा केली आहे. आतापर्यंत भारताला मात्र त्यातून वगळलेलं होतं. आता ट्रम्प यांनी थेटच इशारा देऊन भारताची अडचण केली आहे का आणि भारताच्या अमेरिकेच्या निर्यातीत त्याचे काय परिणाम होणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे.