PM Modi Visit Solapur : मोदींचा उद्या सोलापूर दौरा , रे नगर प्रकल्पाचं मोदींच्या हस्ते लोकार्पण
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPM Modi Visit Solapur : मोदींचा उद्या सोलापूर दौरा , रे नगर प्रकल्पाचं मोदींच्या हस्ते लोकार्पण
सोलापूर - देशातील सर्वात मोठ्या गृह प्रकल्पाचे लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारीला सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत. प्राथमिक माहितीनुसार दहा वाजून 45 मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापुरात येतील. सोलापुरातल्या कुंभारी येथे साकारण्यात आलेल्या रे नगर गृहनिर्माण संस्थेतील पंधरा हजार घरांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. यासह महाराष्ट्रात पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या एकूण 90 हजार घरांचे लोकार्पण देखील याच कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. शिवाय मालेगाव, भिवंडी, सांगली, शेगाव, उल्हासनगर, सातारा, कल्याण डोंबिवली, चंद्रपूर या आठ शहर आणि जिल्ह्यात अमृत योजनेद्वारे सुमारे 1700 कोटी रुपयांचे प्रकल्प साकारले जाणार आहेत. याची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सोलापुरातल्या या कार्यक्रमातून केली जाईल. तसेच महाराष्ट्रातील दहा हजार लाभार्थ्यांना पंतप्रधान स्वनिधीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील कर्ज वाटप ही करण्यात येईल. याचा दौ-याचा आढावा आफताब देईल. तसंच मंचावर 5 महिलांना नरेंद्र मोदींच्या हस्ते चावी दिली जाणार आहे.