Petrol : देशहितासाठी पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करावा, PM Modi यांचं राज्यांना आवाहन ABP Majha

Continues below advertisement

देशहितासाठी पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी  केलंय. केंद्र सरकारनं इंधनावरच्या एक्साईज ड्युटीत कपात केल्याची आठवण यावेळी पंतप्रधानांनी करुन दिली. तर केंद्राच्या आवाहनानंतरही इंधनावरील व्हॅट कमी न करणाऱ्या राज्यांची यादीच मोदींनी वाचून दाखवली. आणि या यादीत आघाडीवरची नाव होतं तेे महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालचं... तसंच भाजपचं सत्ता असलेल्या राज्यातील इंधनाचे दर , आणि भाजपची सत्ता नसलेल्या राज्यातील पेट्रोलच्या दरातील तफावत मोदींनी अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला... आता पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला ठाकरे सरकार प्रतिसाद देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.. केंद्रानं इंधनावरील एक्जाईज ड्युटीत कपात केल्यानंतर महाविकास आघाडीनंही व्हॅट कमी करावा अशी मागणी भाजपनं लावून धरली होती. मात्र रिकाम्या तिजोरीकडे बोट दाखवत इंधनावरील व्हॅटमध्ये कपात करण्यास  राज्य सरकारनं नकारघंटा वाजवली होती.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram