PM Modi on Congress : सामान्यांची संपती लूटण्याचा काँग्रेसचा कट, नरेंद्र मोदी यांचा हल्लाबोल
Narendra Modi, Satara Meeting :" काँग्रेसने 40 वर्षांपासून सैनिक परिवारापासून वन रँक वन पेंशन पासून वंचित ठेवले. फक्त 500 कोटींचा झुनझुना दाखवला. डोळ्यात धुळ फेकण्यात आणि खोटं बोलण्यात काँग्रेस पक्ष मास्टर आहे. काँग्रेसने 60 वर्ष राज्य केले. मात्र, बाबासाहेबांचे संविधान जम्मू काश्मीरमध्ये लागू होत नव्हते. मात्र, आम्ही 370 आर्टिकल ध्वस्त करुन टाकले. मोदीने आर्टीकल 370 आर्टिकल हटवले", असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले. सातारा लोकसभेचे भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.
नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले, सातारा देशभक्तांसाठी तीर्थक्षेत्रांपेक्षा कमी नाही. उदयनराजेंना तुम्ही येथे उमेदवार बनवले. साताऱ्यात भगवा फडकत राहिला आहे, आणि फडकत राहिला आहे. मी आज तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. तुम्ही तुमच्या सेवकावर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे मी आज इथे आलो आहे. एवढ्या मोठ्या संख्येने माता-भगिनी आल्या आहेत.