Maharashtra Corona : 'महाराष्ट्र पॅटर्न'चं मोदींकडून कौतुक; पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्यात चर्चा

Continues below advertisement

मुंबई : महाराष्ट्र कोरोनाविरोधातील लढाई चांगली लढत आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे. पंतप्रधानांनी आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरुन बातचीत केली. यावेळी कोरोनाविरुद्ध लढाईत महाराष्ट्र करत असलेल्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून माहिती घेतली. तसंच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी मुकाबला करताना महाराष्ट्र चांगली लढाई लढतो आहे, असं सांगितले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी देखील विशेषत: महाराष्ट्राला ऑक्सिजनच्या बाबतीत अधिक बळ मिळावे अशी विनंती केली आणि विविध उपाययोजनांची माहिती दिली. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी कसे नियोजन करत आहोत त्याविषयीही मुख्यमंत्री बोलले. पंतप्रधान आणि केंद्र सरकार हे कोरोना लढ्यात महाराष्ट्राला प्रथमपासून मार्गदर्शन करत असून त्याचा चांगला उपयोग राज्य सरकारला होत आहे. महाराष्ट्राच्या काही सूचना केंद्राने मान्यही केल्या याविषयीही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram