BMC Polls : Piyush Goyal अॅक्शन मोडमध्ये, मुंबईतील विकास कामांचा आढावा
Continues below advertisement
केंद्रीय मंत्री पियूष गोयल (Piyush Goyal) यांनी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील (Mumbai) विकास कामांचा आढावा घेतला. 'संपूर्ण पायाभूत सुविधांचे जाळे मुंबईतील प्रत्येक नागरिकाला शहरात कुठेही एका तासापेक्षा कमी वेळेत प्रवास करण्याची हमी देईल', असे विधान गोयल यांनी केले आहे. बोरिवलीतील (Borivali) महापालिकेच्या आर सेंट्रल कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी उत्तर मुंबईतील (North Mumbai) रस्ते, वाहतूक, पायाभूत सुविधा, पुनर्विकास आणि सुरक्षेच्या मुद्द्यांवर चर्चा केली. या बैठकीत कोस्टल रोडचा विस्तार, मढ-वर्सोवा पूल आणि बोरिवली-ठाणे बोगद्याच्या कामाचा आढावा घेण्यात आला. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement