Maharashtra Politics : निवडणुकांची लगबग; कुठे तारखांचा अंदाज, कुठे गाऱ्हाणं Special Report

Continues below advertisement
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरून (Local Body Elections) राजकारण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी मंचर येथील एका कार्यक्रमात निवडणूक कार्यक्रमाचा अंदाज जाहीर केला, तर दुसरीकडे शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुंबईच्या महापौरपदासाठी (Mumbai Mayor) देवाला साकडे घातले. 'माझ्या माहितीनुसार साधारणपणे पंधरा डिसेंबरला जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचं मतदान होईल आणि एकतीस जानेवारीपूर्वी हा सगळा कार्यक्रम संपेल,' असे वक्तव्य वळसे पाटील यांनी केले. यानंतर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा केवळ अंदाज असल्याचे सांगत वेळ मारून नेली. दरम्यान, मुंबईतील मालवणी महोत्सवात बोलताना उद्धव ठाकरेंनी, आमचा महापौर होऊ दे, असे गाऱ्हाणे घातले आणि 2012 साली सुनील प्रभू (Sunil Prabhu) असेच महापौर झाल्याची आठवण सांगितली. यावर महायुतीचाच (Mahayuti) महापौर बसेल, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी व्यक्त केला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola