pimpri chinchwad : पिंपरी चिंचवडला चक्क एका मांजरीमुळं शंभर कोटींचा फटका : ABP Majha

पिंपरी चिंचवडला चक्क एका मांजरीमुळं शंभर कोटींचा फटका बसलाय. पिंपरी चिंचवडमधील महापारेशनच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये आज मांजर घुसल्याने शहरातील बत्ती गुल झाली. विजेच्या धक्क्याने मांजरीच्या जागीच मृत्यू झाला. पण आकुर्डी, भोसरी, भोसरी एमआयडीसी भागातील साठ हजार ग्राहकांना याचा मोठा फटका बसला. दरम्यान यानंतर एमआयडीसीमधील सात हजार ५०० कंपन्याना बारा तासच वीज पुरवठा होणार आहे.. तर बारा तासांचं लोड शेडिंग सुरु राहणार आहे.. पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये दुरुस्ती होईपर्यंत ही परिस्थिती अशीच राहणार आहे.. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola