Pawar Politics : Ajit Pawar परत BJP सोबत जाणार नाहीत, याची खात्री काय? Pimpri-Chinchwad जनतेचा सवाल

Continues below advertisement
पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) दोन्ही गटांच्या संभाव्य एकीकरणावर नागरिकांनी तीव्र नाराजी आणि अविश्वास व्यक्त केला आहे. शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांचे गट भाजपविरोधात (BJP) एकत्र लढण्याच्या शक्यतेवर, मतदार आपल्या मताला किंमत उरली नसल्याचे म्हणत आहेत. 'मताला किंमतच राहिली नाही, नेते फक्त स्वतःचा फायदा बघतात,' अशी संतप्त प्रतिक्रिया एका नागरिकाने दिली. निवडणूक झाल्यावर अजित पवार गट पुन्हा भाजपसोबत जाणार नाही, याची शाश्वती काय, असा थेट सवाल नागरिक विचारत आहेत. नेते स्वतःचे खिसे भरण्यासाठी राजकारण करतात आणि जनतेच्या प्रश्नांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात, असा आरोपही नागरिकांनी केला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola