Mundhwa Land Scam: 'अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा', Anjali Damania यांची मागणी
Continues below advertisement
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंढवा जमीन घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दमानिया यांनी अजित पवारांच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे पालकमंत्री पदाच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, जेणेकरून प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊ शकेल. त्यांनी दावा केला की, शीतल तेजवानी यांच्या नावे असलेली पॉवर ऑफ ॲटर्नी नोंदणीकृत नाही आणि त्यात विक्रीचे अधिकार नाहीत. ‘अजित पवारांनी तत्काळ उपमुख्यमंत्रीपदाचा आणि पालकमंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे, तरच याच्यात चौकशी होऊ शकेल,’ असे अंजली दमानिया म्हणाल्या. तसेच, या व्यवहाराची संपूर्ण माहिती पार्थ पवार यांना होती आणि अमेडिया एंटरप्रायझेस या कंपनीला करार रद्द करण्याचा अधिकार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement