Phaltan Doctor Case 'शवविच्छेदनाचा अहवाल देताना महिला डॉक्टरवर कोणता दबाव होता का?'

Continues below advertisement
फलटण (Phaltan) येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्येने एका जुन्या प्रकरणाला वाचा फोडली आहे. लष्करी अधिकारी अजिंक्य निंबाळकर (Ajinkya Nimbalkar) याची पत्नी दिपालीच्या (Dipali) आत्महत्येचा तपास पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दिपालीच्या कुटुंबियांनी आरोप केला आहे की, 'शव विच्छेदनाचा अहवाल बदलण्यासाठी मृत महिला डॉक्टरवर दबाव होता'. दिपालीचे लग्न २०२१ मध्ये अजिंक्य निंबाळकरसोबत झाले होते, मात्र लग्नानंतर तिचा छळ होत असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. १९ ऑगस्ट २०२५ रोजी दिपालीने आत्महत्या केली होती. आता, ज्या डॉक्टरने दिपालीच्या शवविच्छेदनाच्या अहवालावर सही केली होती, त्याच डॉक्टरने आत्महत्या केल्याने दिपालीच्या कुटुंबीयांनी हा अहवाल खोटा असल्याचा दावा केला आहे. या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola