Phaltan Doctor Case : फलटण डॉक्टर मृत्यू प्रकरण राजकीय आरोप-प्रत्यारोप Special Report
Continues below advertisement
फलटण (Phaltan) येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणावरून राजकारण तापले आहे. या प्रकरणात शिवसेना (UBT) उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsinh Naik Nimbalkar) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 'रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सांगण्यावरून खोट्या केसेस दाखल करून भीतीचे वातावरण तयार केल्याने नैराश्यातून पीडितेला आत्महत्येला सामोरे जावे लागले', असा आरोप अंधारे यांनी केला आहे. दुसरीकडे, शवविच्छेदन अहवालात डॉक्टरचा मृत्यू गळफास घेतल्याने झाल्याचे स्पष्ट झाले असले तरी, त्यांच्या वडिलांनी ही हत्या असल्याचा दावा केला आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने (Gopal Badane) याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, त्याने आपला मोबाईल लपवल्याने अनेक डिजिटल पुरावे नष्ट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, अंधारेंनी प्रसिद्ध केलेल्या ऑडिओ क्लिपमुळे आणि निंबाळकरांनी त्यांच्यावर दाखल केलेल्या ५० कोटींच्या मानहानीच्या दाव्यामुळे हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे झाले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement