Devendra Fadnavis : 'आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचे Pappu बनू नये', मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोला

Continues below advertisement
महाराष्ट्राच्या राजकारणात 'पप्पू' या शब्दावरून नवा वाद पेटला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि शिवसेना (UBT) आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यात शाब्दिक चकमक उडाली आहे. 'आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचे पप्पू बनू नये', असा थेट टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लगावला आहे. वरळीतील (Worli) कथित बोगस मतदारांवर (Bogus Voters) आदित्य ठाकरे यांनी राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) स्टाईलमध्ये एक प्रेजेंटेशन दिले होते, ज्यावर प्रतिक्रिया देताना फडणवीसांनी ही टिप्पणी केली. भाजपकडून सातत्याने राहुल गांधींवर टीका करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 'पप्पू' या शब्दाचा धागा पकडत फडणवीसांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला, ज्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola