Phaltan Suicide Case: 'तिन्ही Mobileमधील Triangle भयानक', तो लोकांसमोर आणण्यासारखा नाही- जयकुमार गोरे

Continues below advertisement
फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. 'तिन्ही मोबाईल पाहिल्यावर जो ट्रायंगल समोर येतोय तो खूप भयानक आहे आणि अशी परिस्थिती लोकांसमोर आणण्यासारखी नाही', असे मोठे विधान मंत्री जयकुमार गोरे यांनी केले आहे. त्यांनी या मृत्यूचे राजकारण थांबवून वस्तुस्थितीदर्शक तपास होऊ देण्याचे आवाहन केले आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याचे आदेश पोलीस महासंचालकांना दिले आहेत. ही एसआयटी एका महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वात गठीत केली जाणार आहे. विरोधकांनी सातत्याने या प्रकरणात एसआयटी चौकशीची मागणी केली होती, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola