Phaltan Doctor : फलटणमधील महिला डॉक्टरची आत्महत्या, पोलीस-आरोग्य विभाग वादाचा बळी?

Continues below advertisement
साताऱ्यातील (Satara) पलटण (Phaltan) उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर संपदा मुंडे (Dr. Sampada Munde) यांनी आत्महत्या (Suicide) केल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस आणि आरोग्य विभागातील वाद या आत्महत्येमागे असल्याचे सांगितले जात आहे. 'माझ्यावर अन्याय होतोय, मी आत्महत्या करेन,' अशी तक्रार डॉक्टर संपदा मुंडे यांनी वरिष्ठांकडे वारंवार केली होती. वैद्यकीय तपासणी संदर्भात पोलिसांशी झालेल्या वादानंतर त्यांच्यावर चौकशी सुरू होती. आपल्यावर होणारा अन्याय सहन करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले होते. अखेर काल रात्री त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याने वैद्यकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे शासकीय कामकाजातील वाद आणि कर्मचाऱ्यांवरील मानसिक ताण यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola