VBA vs RSS : आरएसएसवर बंदीची मागणी, वंचित बहुजन आघाडी मोर्चावर ठाम

Continues below advertisement
छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) वंचित बहुजन आघाडी (VBA) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) यांच्यातील संघर्ष पेटला आहे. आरएसएसवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी VBA ने मोर्चाचे आयोजन केले आहे, मात्र पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. 'मोर्चाची परवानगी येवो का न येवो, मोर्चा तर निघणार आहे', अशी ठाम भूमिका वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) यांनी जाहीर केली आहे. पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, पोलिसांनी वंचित बहुजन आघाडीच्या अनेक कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना रात्रीतूनच नोटिसा बजावल्या आहेत. मात्र, सुजात आंबेडकर यांनी स्वतः मोर्चात सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केल्याने, पोलीस प्रशासन आणि वंचित बहुजन आघाडीतील तणाव वाढला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola