Phaltan Doctor Suicide: 'फडणवीसांचं लक्ष फक्त राजकारणाकडे', संजय राऊतांचा गृहमंत्रालयावर हल्लाबोल
Continues below advertisement
फलटण (Phaltan) येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण आणि नवी मुंबईतील सिडको (CIDCO) जमीन घोटाळ्यावरून राजकारण तापले आहे. या प्रकरणी संजय राऊत, अंबादास दानवे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली आहे, तर रोहित पवार यांनी मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. 'गृहखात्याकडे फडणवीसांचं लक्ष नाही, लक्ष फक्त राजकारणाकडे,' असा थेट आरोप संजय राऊत यांनी केला आहे. फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आरोपी पोलीस उपनिरीक्षक प्रशांत बनकरला (Prashant Bankar) अटक करण्यात आली आहे. तर, सिडको जमीन घोटाळा प्रकरणी वनविभागाच्या अहवालात आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या आरोपात तथ्य असल्याचे समोर आले आहे. याशिवाय, सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणात सीबीआयने (CBI) रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty) क्लीन चिट दिली असून, सुशांतच्या कुटुंबीयांनी या निर्णयाला आव्हान देणार असल्याचे म्हटले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement