Phaltan Doctor Crime : महिला डॉक्टरने संपवले जीवन; खासदार, पोलीस दबावाखाली? Special Report
Continues below advertisement
फलटणमधील (Phaltan) महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी पोलीस (Police) आणि एका खासदारावर (MP) गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ‘मी बीडची (Beed) असल्यानं आरोपींना फिटनेस सर्टिफिकेट देत नसल्याचा उल्लेख खासदारांनी केला’, असा धक्कादायक आरोप आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरने आपल्या कार्यालयीन चौकशीच्या जबाबात केला होता. पीडित डॉक्टरने तिच्या हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने (Gopal Badne) आणि प्रशांत बनकर (Prashant Bankar) यांची नावे लिहिली आहेत. पोलिसांनी चार वेळा बलात्कार केल्याचेही तिने म्हटले आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी आणि नियमबाह्य फिटनेस सर्टिफिकेट देण्यासाठी पोलिसांकडून दबाव येत असल्याचा आरोप डॉक्टरच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी तिने दोन महिन्यांपूर्वी तक्रार अर्ज दिला होता, पण कोणताही गुन्हा दाखल झाला नाही. या संपूर्ण प्रकरणात राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, मुख्यमंत्र्यांनी आरोपी पोलिसांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement