VBA vs RSS: आरएसएसला फक्त आंबेडकरी हरवू शकतात- सुजात आंबेडकर
Continues below advertisement
वंचित बहुजन आघाडीचे (VBA) युवा नेते सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) छत्रपती संभाजीनगरमधील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. 'हमको बहुत लोग आके नाम रखते हैं, बी टीम बोलते हैं... वंचित बहुजन आघाडीने आरएसएस के कार्यालय पर मोर्चा निकाला है। तेरे में है हिम्मत? अगर दम है तो शामिल होके दिखाओ,' अशा शब्दात सुजात आंबेडकर यांनी थेट आव्हान दिले आहे. पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली असतानाही, RSS वर बंदी घालण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. संघाच्या सदस्य नोंदणी मोहिमेला विरोध केल्यामुळे दोन कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. तर, हा मोर्चा म्हणजे केवळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेली राजकीय स्टंटबाजी आहे, अशी प्रतिक्रिया संघ स्वयंसेवकांनी दिली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement