CM Fadnavis : 'महिला IPS अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात SIT स्थापन करा',पोलीस महासंचालकांना थेट आदेश
Continues below advertisement
फलटण (Phaltan) प्रकरणासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 'फलटण प्रकरणी महिला आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एक एसआयटी (SIT) गठीत करावी', असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालकांना दिले आहेत. या प्रकरणामध्ये स्थानिक पोलीस (Police) अधिकाऱ्यांवर आरोप होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. एका महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वात ही एसआयटी (SIT) स्थापन होणार असून, या प्रकरणाचा सखोल तपास केला जाणार आहे. सरकार या प्रकरणी ॲक्शन मोडवर असल्याचे दिसून येत आहे, कारण मुख्यमंत्र्यांनी स्वतः यामध्ये लक्ष घालून तपासाच्या सूचना दिल्या आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement