Petrol-Diesel Price : मे महिन्यात 15 व्या वेळेस इंधन दरवाढ, पेट्रोल शंभरीपार ; जनता हैराण

Continues below advertisement

मुंबई : मे महिन्यात 15 व्या वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्याचं पहायला मिळतंय. शनिवारी देशभरात पेट्रोलची किंमत 25 पैशांची तर डिझेलच्या किंमतीत जवळपास 33 पैशांची वाढ झाली आहे. पेट्रोलची विक्री 100 रुपयांवर होत असलेली मुंबई ही देशातील पहिली मेट्रो सिटी बनली आहे. परभणीत सर्वाधिक म्हणजे 102.57 रुपयांने पेट्रोलची विक्री होत असून डिझेलचीही शंभरीकडे वाटचाल सुरु आहे. 

मुंबईत पेट्रोल आज 100.19 रुपये आणि डिझेल 92.17 रुपये प्रति लिटर आहे. दिल्लीमध्ये आज पेट्रोलची किंमत 93.94 रुपये तर डिझेल 84.89 रुपये आहे. कोलकात्यात पेट्रोल 93.97 रुपये आणि डिझेल 87.74 रुपये आणि चेन्नईमध्ये पेट्रोल 95.51 रुपये आणि डिझेल 89.65 रुपये प्रति लिटर आहे. 

परभणी जिल्ह्यात आज पुन्हा इंधनाचे दर वाढले असून पेट्रोल 25 पैशांनी तर डिझेल 33 पैशांनी महागले आहे. परभणीत पेट्रोलची किंमत 102. 57 रुपये असून डिझेलची किंमत 93.05 रुपयांवर पोहोचली आहे. पेट्रोलपाठोपाठ डिझेलचीही शंभरीकडे वाटचाल सुरु आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram