Petrol-Diesel Price | मुंबईत डिझेलची सेंच्युरी, पेट्रोलही महागलं
Continues below advertisement
देशातील पेट्रोलच्या किंमतीने या आधीच शंभरी पार केली असून ते रेकॉर्ड ब्रेक स्तरावर आलं आहे. त्या पाठोपाठ आता डिझेलच्याही किंमतीने शंभरी पार केली आहे. आधीच महागाईने हैराण झालेल्या सामान्यांच्या खिशाला आता इंधन दरवाढीची कात्री लागली आहे. मुंबईत आज पेट्रोलच्या दरात 29 पैसे वाढ झाली असून ते 109.83 रुपयांवर पोहोचलं आहे. तर डिझेलच्या किंमतीत 37 पैशांची वाढ झाली असून ते 100.29 रुपयांवर पोहोचलं आहे.
Continues below advertisement