Petrol Diesel Price Hike : शेजारच्या राज्याच पेट्रोल, डिझेल स्वस्त; महाराष्ट्रात कधी होणार?ABP Majha
Continues below advertisement
महाराष्ट्र सरकार पेट्रोल, डिझेलवरील कर कमी करत नसल्यानं सीमेवरील नागरिक आता शेजारच्या राज्यांतील पेट्रोल पंपावर जाऊन इंधन भरू लागलेत. कारण पेट्रोल, डिझेलच्या किंमती केंद्रानं ५ आणि १० रुपयांनी कमी केल्यानंतर काही राज्यांनीही कर कमी केले आणि त्यामुळे या राज्यांत दर आणखी कमी झालेत. महाराष्ट्राच्या शेजारच्या ४ राज्यांनी कर कमी केल्यानंतर सीमेजवळच्या पेट्रोल पंपावर जाऊन लोक पेट्रोल आणि डिझेल भरतायत. त्यामुळे सीमेजवळच्या पेट्रोल पंपावरील इंधनाची विक्री ५० टक्क्यांनी वाढलीय.
Continues below advertisement