Petrol Diesel Price : देशात इंधन दरवाढीचा भडका; महाराष्ट्रातील परभणी, नांदेडमध्ये पेट्रोल शंभरीपार
Continues below advertisement
मागच्या आठवडाभरापासून देशभरात इंधन दरवाढ सुरु असून आठ दिवसांत पेट्रोल 1 रुपया 40 पैसे तर डिझेल 1 रुपये 63 पैश्याने महागले आहे. ज्यामुळे परभणीत पेट्रोलने शंभरी पार केलीय तर डिझेलही नव्वद रुपयांच्या पुढे गेले आहेत. आज आठव्या दिवशी 5 राज्याच्या निवडणूका झाल्या आणि देशभरात इंधन दरवाढ सुरु झाली. 8 दिवसांपासून सुरु असलेली दरवाढ आजही कायम असून आज पेट्रोलमध्ये 24 पैसे, डिझेलमध्ये 26 पैसे वाढ झाली आहे. याचा परिणाम सर्वत्र दिसत आहे. परभणीत देशातील सर्वात महाग म्हणजे पेट्रोल 100.75 पैसे तसेच डिझेलही 90 रुपये 68 पैसे दराने विक्री केले जात आहे. अगोदरच कोरोनामुळे लागेलले लॉकडाऊन आणि त्यात ही इंधन दरवाढ त्यामुळे सर्वसामान्य परभणी करांवर आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याने ही दरवाढ कमी करण्याची मागणी करण्यात येत आहे.
Continues below advertisement
Tags :
Petrol Price Fuel Rate Petrol Diesel Price Hike Petrol Diesel Price Disel Price Petrol In Maharashtra