Indapur : पोलिसांच्या गाडीली धडक देऊन आरोपीला पळवण्याचा नातेवाईकांचा प्रयत्न; 4 पोलीस जखमी
पोलिसांच्या गाडीला धडक देवून आरोपीस पळवून नेण्याचा प्रयत्न आरोपीच्या नातेवाईकांनी केलाय. टेभुर्णी पोलीस स्टेशन हद्दीत दरोडा टाकून फरार असलेल्या आरोपीच्या शोधत पोलीस इंदापूर मधील सुगावा येथे आले होते. आरोपी अमोल सावंतला सुगाव येथील राहत्या घरातुन अटक केली. त्याला टेंभुर्णी पोलीस ठाण्यात आणत असताना आरोपीच्या नातेवाईकांनी पोलीस गाडीचा पाठलाग करून वाहनाला पाठीमागुन धडक देत पोलिसांना जीवे मारण्याचा आणि आरोपीला पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना सोमवारी माळवाडी नं.1 येथे घडली. यामध्ये टेंभूर्णी सहाय्यक पोलीस निरीक्षकासह तीन जण जखमी झाले आहे. या प्रकरणी योगेश रावसाहेब चितळे टेंभुर्णी पोलीस स्टेशन यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.