Petrol Diesel Price: पेट्रोल शंभरी पार तर डिझेल शंभरीच्या उंबरठ्यावर; नागपूर, सांगलीतील आजचे दर काय?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 May 2021 02:59 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : मे महिन्यात 15 व्या वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्याचं पहायला मिळतंय. शनिवारी देशभरात पेट्रोलची किंमत 25 पैशांची तर डिझेलच्या किंमतीत जवळपास 33 पैशांची वाढ झाली आहे. पेट्रोलची विक्री 100 रुपयांवर होत असलेली मुंबई ही देशातील पहिली मेट्रो सिटी बनली आहे. परभणीत सर्वाधिक म्हणजे 102.57 रुपयांने पेट्रोलची विक्री होत असून डिझेलचीही शंभरीकडे वाटचाल सुरु आहे. तर सांगलीत प्रथमच 100 रुपयाच्या वरती पेट्रोलचे दर गेले असून आजचा पेट्रोलचा दर हा 100.01 रुपये इतका आहे.