Parbhani : आज पेट्रोलच्या दरात पुन्हा वाढ; महाराष्ट्राच्या परभणीत पेट्रोल दर प्रति लिटर 110 रुपये

Continues below advertisement

Petrol-Diesel 17 July: तेल कंपन्यांनी शनिवारी डिझेलच्या दरात कुठलीही वाढ केली नसली तरी पेट्रोलच्या दरात मात्र पुन्हा वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीमध्ये आज पेट्रोल 30 पैशांनी वाढलं असून डिझेल दर स्थिर आहेत. देशभरात तेलाच्या किमतींनी सर्वच रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. पेट्रोलनं केव्हाच शंभरी ओलांडली आहे, तर डिझेलचे दर शंभरी गाठण्याच्या तयारीत आहेत. यापूर्वी गुरुवारी पेट्रोलच्या दरात 35 पैसे आणि डिझेलच्या दरात 15 पैसे प्रति लिटरनं वाढ करण्यात आली होती. दिल्लीमध्ये आज पेट्रोल 101.84 रुपये आणि डिझेल 89.87 रुपये प्रति लिटरनं विकण्यात येत आहे. 

दरम्यान परभणीमध्ये पेट्रोल दराने 110 रुपये दर पार केला आहे. परभणीत आज पेट्रोलच्या दरात 25 पैशांनी वाढ झाली आहे.  जिल्ह्यात पेट्रोल दर 110 रुपये 15 पैसे तर  डिझेल 98.21 पैश्यांवर पोहोचले आहे.  दरम्यान, देशातील सर्व महानगरातील पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाना, तमिलनाडू, कर्नाटक, जम्मू आणि कश्मीर, ओडिशा, केरळ, बिहार, पंजाब, लड्डाख, सिक्किम आणि दिल्ली या ठिकाणी पेट्रोलचे दर शंभर रुपयांच्या वरती गेले आहेत. देशात 15 जून 2017 पासून इंधनाचे दर रोज बदलण्यास सुरुवात झाली. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आता भारतातील तेल कंपन्या ठरवतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक क्षणाला तेलाच्या किंमती बदलत असतात. त्यामुळे देशात आता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दर दिवशी सकाळी सहा वाजता बदलतात.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram