Solapur : सुशील, सुशीलकुमार नाव असलेल्या व्यक्तीला काँग्रेस नगरसेविकेतर्फे 501₹ चं पेट्रोल मोफत!

Solapur : माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापुरात काँग्रेस पदाधिकाऱ्यांतर्फे अनोखे उपक्रम राबविण्यात आले. मात्र सर्वात जास्त चर्चा झाली ती मोफत पेट्रोल वाटपाची. ज्या व्यक्तींचे नाव सुशील किंवा सुशीलकुमार आहे अशा व्यक्तिंना पाचशे एक रुपयाचे पेट्रोल मोफत देण्यात आले. काँग्रेसच्या नगरसेविका फिरदोस पटेल यांच्यावतीने सुशील आणि सुशीलकुमार नाव असलेल्या व्यक्तींना हे अनोखे गिफ्ट देण्यात आले. दिवसेंदिवस पेट्रोलचे दर वाढत आहेत. अशा काळात मोफत पेट्रोल मिळत असल्याने सुशील आणि सुशीलकुमार नाव असलेल्या व्यक्तींनी पेट्रोल पंपवरती एकच गर्दी केली. सकाळी नऊ वाजता या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. आधार कार्डवर सुशील किंवा सुशीलकुमार नाव असलेल्या व्यक्तींना फेटा बांधून त्यांचे तोंड गोड करुन ५०१ रुपयांचे पेट्रोल मोफत देण्यात आले. अवघ्या तासाभरातच जवळपास दोनशेहून अधिक व्यक्तींनी या उपक्रमाचा लाभ घेतला. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसामुळे मिळालेल्या गिफ्टमुळे सुशील आणि सुशीलकुमार नावाचे व्यक्ती भलतेच खुश झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola