Tuljapur Temple : श्रीतुळजाभवानी मातेच्या मंदीरात भाविकांची प्रचंड गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
दिवाळीची सुट्टीमुळे पर्यटन स्थळांसोबतच मंदिरांमध्येही गर्दी बघायला मिळतेय. तुळजापूर शहर देखील भाविकांनी हाऊसफुल्ल झाल्याचं चित्र दिसतंय. 18 महिन्यानंतर मंदिरं खुली करण्यात आली. त्यामुळे साडे तिन शक्तीपीठांपैकी संपुर्ण पीठ असलेल्या श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरात भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनाला येत आहेत. तर दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांचा संप असल्यामुळे भाविकांना गैरसोयीला सामोरं जावं लागतंय. खाजगी वाहनांच्या मोठ्या संख्येमुळे जागोजागी वाहतूक कोंडी बघायला मिळतेय. दर्शनासाठीचे पास मिळवण्यासाठी देखील भाविकांची भलीमोठी रांग लागली आहे. त्यात सोशल डिस्टन्सिंग मात्र पुरता बोजवारा उडाल्याचं चित्र आहे. तर दुसरीकडे जेजुरी गडावरही खंडोबाच्या दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती. सदेवस्थानच्या वतीने कोरोनाचे सर्व नियम पाळून भाविकांना दर्शन दिले जात होतं.