Pench Tiger Sanctuary : पेंच व्याघ्र प्रकल्पात 'बोट जंगल सफारी'

Continues below advertisement

Pench Tiger Sanctuary : पेंच व्याघ्र प्रकल्पात 'बोट जंगल सफारी' जंगल सफारीत आपण जिप्सी किंवा हत्तीवर बसून जंगलात फेरफटका मारतो.. मात्र आता लवकरच बोटमध्ये बसून जंगलाच्या मधोमध वाहणाऱ्या नदीतून जंगल सफारी करणं शक्य होणार आहे.. भारतातील पहिल्या "बोट जंगल सफारी"ची नागपूरातील पेंच व्याघ्र प्रकल्पात जून महिन्यातील तिसऱ्या आठवड्यात सुरुवात होणार आहे.. या बोट जंगल सफारीच्या माध्यमातून वन्यप्रेमी आणि पर्यटकांना नदीच्या दोन्ही किनाऱ्यावर पाणी पिण्यासाठी येणाऱ्या वाघ, बिबट, अस्वल, हरीण, रानगवे व इतर वन्य प्राण्यांचे निरीक्षण करता येणार... तसेच पाण्यातील मासे, मगरी आणि नदीच्या अवतीभवतीच्या क्षेत्रात राहणाऱ्या हजारो पक्ष्यांचे निरीक्षणही करता येणार आहे... ही बोट जंगल सफारी 23 किलोमीटरची असून त्यासाठी अडीच तासांचा कालावधी लागणार आहे... सर्वात खास बाब म्हणजे पेंच व्याघ्र प्रकल्पातील ज्या भागातून ही बोट जंगल सफारी सुरू होणार आहे, त्या भागातील जंगलात तब्बल वीस वाघांचे वास्तव्य आहे... त्यामुळे वाघ प्रेमींसाठी ही बोट जंगल सफारी वेगळी पर्वणी ठरणार आहे.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram