Pawar vs Thackeray: 'माझ्या अंगावर भोकं पडत नाहीत', Ajit Pawar यांची Raj Thackeray यांच्या मिमिक्रीवर टीका

Continues below advertisement
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात पुन्हा एकदा राजकीय कलगीतुरा रंगला आहे. 'मिमिक्री करणारे मिमिक्री करत राहतील, काम करणारा मी कामाचा म्हणून काम करत राहीन', अशा शब्दांत अजित पवार यांनी राज ठाकरेंच्या मिमिक्रीला प्रत्युत्तर दिले आहे. मतदार यादीतील त्रुटींसंदर्भात महाविकास आघाडी आणि मनसेने घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी अजित पवारांची नक्कल केली. 2017 साली झालेल्या अशाच एका पत्रकार परिषदेत अजित पवार कसे तावातावाने बोलत होते, याची आठवण करून देत त्यांनी पवारांना चिमटा काढला. यावर प्रतिक्रिया देताना, आपल्याला अशा नक्कलबाजीने काही फरक पडत नाही आणि आपण कामावर लक्ष केंद्रित करतो, असे अजित पवारांनी स्पष्ट केले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola