2024 साठी 'पवार'फुल रणनीती? प्रशांत किशोर-शरद पवार यांच्यात 'सिल्वर ओक'वर तीन तास बैठक
Continues below advertisement
मुंबई : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आज महाविकास आघाडीचे शिल्पकार राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत दोघांमध्ये जवळपास तीन तास वेगवेगळ्या विषयांवर गप्पा रंगल्या. पश्चिम बंगाल निवडणूक, देशातील राजकीय परिस्थिती याबाबत या भेटीत सविस्तर चर्चा झाली असल्याची माहिती आहे. पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेसच्या विजयानंतर या भेटीला विशेष महत्व आले होते. भेटीनंतर त्यांनी एकत्र जेवण केलं अशीही माहिती आहे.
Continues below advertisement