Farm Loan Waiver: 'सरकारचं काम फक्त कर्जमाफी आणि नुकसान भरपाई देणंच आहे का?', पटेलांचा सवाल
Continues below advertisement
राज्यात कर्जमाफीच्या (Farm Loan Waiver) मुद्द्यावरून पुन्हा एकदा वाद पेटण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कर्जमाफीवर केलेल्या वक्तव्याला कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल (Pasha Patel) यांनी पाठिंबा दिला आहे. 'सरकारचं काम फक्त कर्जमाफ करणं आणि नुकसान भरपाई देणं हेच आहे का?', असा सवाल पाशा पटेल यांनी उपस्थित केला आहे. पटेल यांच्या मते, अजित पवारांचे वक्तव्य चुकीचे नाही. यावरून आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अजित पवारांनी बारामतीमधील एका कार्यक्रमात, 'वारंवार कर्जमाफी कशी द्यायची? शेतकऱ्यांनीही कर्ज वेळेत फेडण्याची सवय लावली पाहिजे' असे म्हटले होते. याच वक्तव्याचे पाशा पटेल यांनी समर्थन केल्याने कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारमध्येच मतभेद आहेत का, अशी चर्चा सुरू झाली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement