Pune Gang War : 'बंडू' Andhekar तुरुंगात, तरीही टोळी Active; रिक्षाचालक Ganesh Kale ची हत्या
Continues below advertisement
पुण्यातील (Pune) कोंढवा (Kondhwa) परिसरात अंधेकर (Andhekar) आणि कोंबकर (Kombkar) टोळीयुद्धातून पुन्हा एकदा निर्घृण हत्येची घटना समोर आली आहे. या हत्येतून अंधेकर टोळी सक्रिय असल्याचे समोर आले आहे. रिक्षाचालक गणेश काळे (Ganesh Kale) यांची गोळीबार करून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. हत्या झालेले गणेश काळे हे कोंबकर टोळीचे सदस्य असलेल्या समीर काळे यांचे भाऊ आहेत. समीर काळे हे बनराज अंधेकर (Banraj Andhekar) यांच्या हत्येतील आरोपी असून सध्या तुरुंगात आहेत. यापूर्वी, अंधेकर टोळीने आयुष कोंबकरची (Ayush Kombkar) हत्या केल्यानंतर टोळीप्रमुख सूर्यकांत उर्फ बंडू अंधेकरसह (Suryakant alias Bandu Andhekar) अनेकांना अटक झाली होती. मात्र, तरीही टोळी सक्रिय असल्याचे या हत्येमुळे स्पष्ट झाले आहे. हल्लेखोर सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement