Pune Land Deal: पार्थ पवारांचा जमीन व्यवहार रद्द? शीतल तेजवानीमुळे नवा पेच

Continues below advertisement
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar), शीतल तेजवानी (Shital Tejwani) आणि दिग्विजय पाटील (Digvijay Patil) यांच्यातील वादग्रस्त पुणे जमीन व्यवहार रद्द करण्याची घोषणा झाली असली तरी, कायद्याच्या किचकट प्रक्रियेमुळे तो प्रत्यक्षात येऊ शकत नाही. कायद्यानुसार, 'अशाप्रकारे एकदा दस्तऐवज नोंदवला की तो रद्द करण्याचा अधिकार फक्त कोर्टाला आहे किंवा दोन्ही पार्ट्यांनी मिळून स्वतः जाऊन तो रद्द करावा लागतो'. या प्रकरणात, विक्री करणाऱ्या शीतल तेजवानी फरार असल्याने आणि दुय्यम निबंधक कार्यालयात त्यांची प्रत्यक्ष उपस्थिती अनिवार्य असल्याने हा व्यवहार रद्द होऊ शकत नाही. तेजवानी यांच्यावर यापूर्वीही फसवणुकीचे आरोप आहेत. सुरुवातीला ७% मुद्रांक शुल्क (Stamp Duty) माफीनंतर, आता हा व्यवहार रद्द करण्यासाठी पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला (Amedia Enterprises) ४२ कोटी रुपयांचा दुप्पट मुद्रांक शुल्क भरावा लागणार आहे. आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी हे प्रकरण उजेडात आणले असून, पुणे पोलिसांच्या तपासावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola