Pune Land Scam: पार्थ पवार जमीन प्रकरणातील शीतल तेजवानीने देश सोडला
Continues below advertisement
पुण्यातील गुन्हेगारी आणि जमीन घोटाळ्यांच्या मालिकांनी शहराला हादरा दिला असून, अनेक हाय-प्रोफाइल प्रकरणामुळे पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुंढवा येथील सरकारी जमीन घोटाळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचे नाव समोर आल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी शीतल तेजवानी पतीसह देश सोडून पळून गेल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याशिवाय, कुख्यात गुंड निलेश घायवळ लंडनमध्ये असल्याचे उघड झाले आहे, तर 'UPSC' परीक्षेत फसवणूक करणारी पूजा खेडकर आणि तिचा पती अद्याप मोकाट आहेत. तसेच, गाजलेल्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातही माध्यमांच्या रेट्यानंतरच आरोपींना अटक झाली होती, ज्यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर सडकून टीका होत आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement