Parth Pawar Land Scam: 'अजित पवारांनी राजीनामा द्यावा', Parth Pawar यांच्यामुळे विरोधक आक्रमक
Continues below advertisement
पुण्यातील वादग्रस्त जमीन व्यवहार प्रकरणी (Land Scam) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांचे नाव समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे अजित पवारांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. पार्थ पवार संचालक असलेल्या अमेडिया कंपनीने (Amedia Company) कोट्यवधी रुपयांची जमीन खरेदी केल्याचा आरोप आहे, ज्यामध्ये केवळ ५०० रुपये मुद्रांक शुल्क भरल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे, या कंपनीचा नोंदणीकृत पत्ता हा अजित पवार यांचे निवासस्थान असलेल्या पुण्यातील 'जिजाई' बंगल्याचा (Jijai Bungalow) देण्यात आला आहे, त्यामुळे निवासी मालमत्तेचा व्यावसायिक वापर कसा केला गेला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणात पार्थ पवार यांचे मामेभाऊ दिग्विजय पाटील (Digvijay Patil) यांच्यासह काही जणांवर गुन्हा दाखल झाला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement