Parth Pawar Land Scam: पार्थ पवार जमीन प्रकरण पेटले, चौकशीसाठी समिती गठीत
Continues below advertisement
पुण्यातील जमीन खरेदी-विक्री प्रकरणावरून राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचे नाव समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर आज अजित पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. पार्थ पवार हे संबंधित जमीन सरकारला परत करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणी सविस्तर चौकशी करण्यासाठी महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीला महिनाभरात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या जमीन व्यवहार प्रकरणाला सध्या स्थगिती मिळण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement