Parth Pawar at Chaundi : नगरच्या चौंडीत पार्थ पवार यांच्या स्वागताचे बॅनर्स, रोहित पवार म्हणतात...

Continues below advertisement

अहमदनगरमधील चौंडीमध्ये आज भाजपचे आमदार राम शिंदे यांच्या निवासस्थानी दिवाळी फराळाचा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमात पार्थ पवार येणार असल्याचे फलक ठिकठिकाणी झळकल्यामुळे हा चर्चेचा विषय झाला आहे. आमदार रोहित पवार यांची सभा देखील  आज चौंडी इथे सायंकाळी होत आहे. त्याच दरम्यान अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे भाजपचे आमदार राम शिंदे यांच्या घरी दिवाळी फराळाला येणार आहेत. त्यामुळे एकीकडे पार्थ पवार यांचा फोटो तर दुसरीकडे रोहित पवार यांच्या फोटोमुळे जामखेड मतदारसंघात दोन्ही फ्लेक्सची चांगली चर्चा सुरु आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram