Mahayuti : रायगडमध्ये महायुतीत ठिणगी, आमदार महेंद्र दळवींचा सुनील तटकरेंवर घणाघात

Continues below advertisement
रायगडमधील (Raigad) राजकारण पुन्हा एकदा तापले असून महायुतीमध्ये (Mahayuti) उभी फूट पडण्याची शक्यता आहे. अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या राष्ट्रवादीने (NCP) ठाकरे सेनेशी (Thackeray Sena) हातमिळवणी केल्याने शिंदे गट (Shinde Sena) आक्रमक झाला आहे. 'त्याच्या मागचे सूत्रधार तटकरे साहेब आहेत,' असा थेट आरोप शिंदे सेनेचे आमदार महेंद्र दळवी (Mahendra Dalvi) यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्यावर केला आहे. तटकरे यांना जशास तसं उत्तर दिलं जाईल, असा इशाराही दळवी यांनी दिला. मात्र, वरिष्ठांच्या आदेशानुसार आम्ही महायुतीचा धर्म पाळणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. स्वतःच्या फायद्यासाठी कोणी आघाडी करत असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही, असे म्हणत दळवी यांनी तटकरेंवर निशाणा साधला आहे. या घडामोडींमुळे रायगडमधील राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola