Sahyadri Guest House : आजारी लेकरांना घेत पालक थेट सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
Sahyadri Guest House : आजारी लेकरांना घेत पालक थेट सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला ; मुलांना फुटपाथवर ठेवत पालकांचे आंदोलन
मुंबई : SSPE आजाराने त्रस्त असलेली मुलांना घेत हतबल पालक आज थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी थेट सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचले. यावेळी मुख्यमंत्र्यांची भेट होत नसल्याने पालकांनी आक्रमक पवित्रा घेत फुटपाथवर आंदोलनाला सुरुवात केली. मुलांना लस मिळत नसल्याने मुल आजारी पडत असल्याचे पालक म्हणाले. आजारी मुलं थेट रस्त्यावर आल्याने अनेक पालकांना अश्रु अनावर झाले. आम्हाला पैसे नको तर सुदृढ आरोग्य द्या, त्यामुळे मुलांना पदपथावर ठेवत पालकांनी आंदोलन केले. धावणारा मुलगा जागेवर थांबला आहे पालक उर्मिला चव्हाण म्हणाल्या की, माझ्या मुलाचे नाव देवांश चौहान आहे. आज मुलगा बेडवर बसून आहे. एकाकी तो आजारी पडला, त्याला बोलता येत नाही, शरीर वाकडं झालं आहे. एसएसपीई हा आजार झाला आहे. अचानक ताप आला व आकडी आली. रुग्णालयात गेलो तर डोक्यात ताप गेल्याचे सांगितले. त्याला रुग्णालयात दाखल केले होते. सर्व चाचणी केल्या पण आजार कळला नाही. मुख्यमंत्र्यांना भेटायला आलो आहे. धावणारा मुलगा जागेवर थांबला आहे. आमच्या मुलावर उपचार करा एवढीच मागणी आहे. सरकारने लक्ष द्यावे, या आजाराने दीड ते दोन हजार मुले आहेत.