Parbhani Accident:धावत्या एसटीचं टायर निखळलं,100 फूट लांब जाऊन पडलं टायर,प्रवासी थोडक्यात बचावले

Continues below advertisement

राज्यातील परिवहन विभागाच्या बसेसची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे..कधी या बस अचानक बंद पडत आहेत तर कधी पुर्ण छप्परच उडत असल्याचे प्रकार समोर आले परभणीत तर चक्क धावत्या बसचे चाकच निखळले आणि 100 फूट लांब पडले या घटनेत सुदैवाने बस मध्ये प्रवास करणारे 62 प्रवाश्यांचा जीव वाचलाय.. गंगाखेड आगाराची बस गंगाखेड हुन पालम कडे 62 प्रवासी घेऊन निघाली होते..गंगाखेड-पालम राष्ट्रीय महामार्गावरील केरवाडी जवळ धावत्या बसचे चाक निखळले..तरीही बस धावत होती.ही बाब याच रस्त्यावरून जात असलेल्या पीक अप चालक भागवत मुंडे यांना दिसली त्यांनी तात्काळ बस चालकाला हातवारे करून आवाज करून लक्षात आणून दिले तेंव्हा बसचालक यांनी ही बस थांबवली...महत्वाचे म्हणजे या बसचा वेग जास्त असल्याने टायर चक्क 100 फुटांपर्यंत जाऊन पडले..सुदैवाने पीक अप चालक भागवत मुंडे यांनी ही गंभीर बाब लक्षात घेऊन बस चालकाच्या लक्षात आणून दिल्याने पुढील अनर्थ टळला..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram