Parbhani Rain : परभणीत मुसळधार पाऊस, गोदावरी नदीला पूर; अनेक गावांत पाणी शिरले
परभणी जिल्ह्यात होत असलेला पाऊस आणि माजलगाव धरणातून सोडण्यात आलेला पाण्याचा विसर्ग यामुळे गोदावरी नदीला पूर आला असुन अनेक गावांत पाणी शिरले आहे. ज्यातून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. कापुस,सोयाबीन, ऊस आदी पीक पाण्याखाली गेली आहेत. तर पाथरी-गुंज रस्त्यावर पाणी झाल्याने गुंज,अंधापुरी, गोंडगाव, उमरा या चार गावांचा संपर्क तुटला असून गुंज पाथरी रस्त्यावर तर जिथे वाहन चालायचे तिथं चक्क तराफ्यातुन गावकरी ये जा करत आहेत..