Parbhani Rain | परभणीत नेमका किती पाऊस? आकड्यात तफावत, सत्य शोधण्यासाठी समिती गठित

Continues below advertisement
परभणी जिल्ह्यात पडलेला पाऊस मोजण्यासाठी शासकीय आणि विविध पातळीवर खाजगी संस्थांची व्यवस्था असते. याच पावसाच्या आकडेवारीवर पेरणी आणि पुढे दुष्काळ, पीक विमा याबाबतचे शासकीय धोरण ठरत असते. परंतु परभणीत याच पावसाच्या मोजलेल्या आकडेवारी बाबत मोठी गुंतागुंत निर्माण झाली आहे. कारण परभणीत एका रात्रीतील 4 तासात तब्बल 186.2 मिमी पाऊस पडल्याचा दावा भारतीय हवामान खात्याने केला आहे. ज्याची नोंद देखील आहे. मात्र याच दिवशी याच वेळी 85 मिमी पावसाची नोंद महसूल विभागाकडे झाली आहे. याहून अधिक म्हणजे कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने तर 58.8 मिमी ची नोंद केली आहे. त्यामुळे नेमके खरे आकडे कुणाचे? हा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळं खरच हा पाऊस एवढा पडलाय का? याचा शोध घेण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी समिती नेमली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram