Parbhani : परभणीत होणार नवी एमआयडीसी; परभणीचे आमदार Rahul Patil यांची उद्योगमंत्र्यांकडे मागणी
परभणीचे आमदार राहुल पाटील आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्यात एक बैठक पार पडली या बैठकीत आमदार राहुल पाटील यांनी परभणीत नवीन MIDC सुरु करण्यासाठी प्रस्ताव दिला होता हा प्रस्ताव तातडीनं मंजूर करून पुढील काही महिन्यात MIDC च्या कामाला वेग येईल असं आश्वासन मंत्री सुभाष देसाईंनी परभणीकरांना दिले या नव्या MIDC मुळे लॅाकडाऊन नंतर मोठ्या प्रमाणात उद्योग धंद्यांना चालना, युवकांना रोजगार मिळेल तसेच राज्याच्या आर्थिक परिस्थितीला हातभार लागेल अशा प्रतिक्रिया राहुल पाटील यांनी दिली आहे