Farmers Protest: विमा कंपनीच्या काट्यात घोटाळा? शेतकरी संतापले

Continues below advertisement
परभणीच्या पालम तालुक्यातील खराब धानोरा गावात पीक विमा कंपनीच्या विरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. अॅग्रीकल्चरल इन्शुरन्स कंपनीकडून (Agricultural Insurance Company) करण्यात आलेल्या पीक कापणी प्रयोगात वजनकाट्यात तफावत आढळल्याने हा वाद निर्माण झाला. 'तत्काळ पीक विमा कंपनी आणि त्यांच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करावा', अशी मागणी संतप्त शेतकऱ्यांनी केली आहे. विमा कंपनीच्या वजनकाट्यावर जे पीक ५ किलो भरले, तेच पीक इतर काट्यांवर ३ किलो भरले. या दोन किलोच्या फरकामुळे आपली फसवणूक होत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी पालम तहसील कार्यालय आणि पोलीस ठाण्यात ठिय्या दिला आहे. कारवाईच्या मागणीसाठी शेतकरी काल रात्रीपासून आंदोलन करत आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola